Home

त्या’ नराधमाला कठोर शिक्षा द्या! नसरापूरमध्ये संतापाची लाट

पुण्याच्या नसरापूरमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. 60 वर्षीय नराधमाने साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून चिमुकलीची दगडाने ठेचून हत्या केली आहे. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

चिमुकली उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी आजीकडे गावी आलेली होते. यावेळी या नराधमाने तिला वासरू दाखवतो म्हणत जनावरांच्या गोठ्यात घेवून गेला आणि तिथेच या चिमुकलीवर अत्याचार करत दगडाने ठेचून हत्या केली आहे. हत्येनंतर चिमुकलीचा मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली नराधमाने लपवून ठेवला.

भिमराव कांबळे असं हा 60 वर्षीय नराधमाचे नाव असून गावकरी त्याच्या विरोधात आक्रमक झाले आहेत. काहीकाळ नागरीकांनी पुणे- सातारा महामार्ग अडवून, गावची बाजारपेठ बंद ठेवली होती, ‘तर या नराधमला आमच्या ताब्यात द्या’ असही गावकरी म्हणाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *