राज्य सरकारच्या शेतकरी कर्जमाफीच्या निर्णयाला आणखी विलंब होण्याची शक्यता आहे. कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी बारामतीतील एका कार्यक्रमादरम्यान ही माहिती दिली आहे. सरकारने कर्जमाफीसाठी पात्र शेतकऱ्यांची माहिती आयकर (इन्कम टॅक्स) विभागाकडून मागवली असून, ही माहिती प्राप्त झाल्यानंतरच कर्जमाफीची अंतिम प्रक्रिया राबवली जाईल. सरकारच्या निकषानुसार, जे शेतकरी आयकर भरतात त्यांना कर्जमाफीचा लाभ दिला जाईल की नाही यावर […]
Home
नसरापूरातील चिमुकलीवरील अत्याचार आणि हत्येप्रकरणी आरोपी भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी
नसरापूर येथील तीन वर्षीय चिमुरडीवरील बलात्कार आणि हत्येप्रकरणी आरोपी भीमराव कांबळे याला न्यायालयाने मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली. हा गुन्हा अत्यंत क्रूर, अमानुष आणि समाजाच्या सामूहिक विवेकाला हादरवणारा असल्याचे न्यायालयाने नमूद केले. निर्णयात आरोपीचा गुन्हेगारी इतिहास, पीडितेवरील अमानुष अत्याचार, निर्घृण हत्या आणि पश्चात्तापाचा अभाव यांचा उल्लेख करण्यात आला. आरोपीच्या बाजूने शिक्षा कमी करण्यासारखी कोणतीही परिस्थिती नसल्याचे […]
बारामतीत दोन दिवसाआड पाणीपुरवठा; नगरपालिकेचा मोठा निर्णय
बारामती : एल निनोच्या प्रभावामुळे कमी झालेला पाऊस, घटलेले जलसाठे आणि नीरा डावा कालव्याचे आवर्तन बंद असल्याने बारामती शहरात पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे बारामती नगरपरिषदेकडून शहरात दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नगरपरिषदेने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, शहरातील विविध भागांना ठराविक दिवशी पाणीपुरवठा केला जाणार असून पुढील आदेशापर्यंत हे नियोजन लागू राहणार […]
परभणीत हनुमान मंदिरातील सभामंडप कोसळला; 7 भाविकांनी जीव गमावला तर 30 हून अधिक जखमी
परभणी जिल्ह्यातील यशवडी येथील प्रसिद्ध हनुमान मंदिरात शनिवारी दुपारी भीषण दुर्घटना घडली. मंदिर परिसरातील सभामंडप अचानक कोसळल्याने 7 भाविकांचा मृत्यू झाला असून 30 हून अधिक जण जखमी झाले आहेत. जखमींवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मंदिरात धार्मिक कार्यक्रम सुरू असताना मोठ्या संख्येने भाविक सभामंडपात उपस्थित होते. याचवेळी मंडपाचा काही भाग अचानक कोसळला. दुर्घटनेनंतर […]
पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता
राज्यातील गाजलेल्या पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणात न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल देत सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. या प्रकरणातील माफीचा साक्षीदार म्हणून सादर करण्यात आलेल्या व्यक्तीची साक्ष विश्वासार्ह नसल्याचे न्यायालयाने निरीक्षण नोंदवले. तसेच, आरोपींविरुद्धचे आरोप सिद्ध करण्यासाठी आवश्यक असलेले ठोस आणि निर्विवाद पुरावे तपास यंत्रणेकडून सादर करण्यात आले नसल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले. न्यायालयाने आपल्या निकालात नमूद […]
स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियानात बारामती बसस्थानकाची बाजी…
बारामती बसस्थानकाने राज्यातील ‘अ’ वर्ग बसस्थानकांमध्ये प्रथम क्रमांक पटकावत ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियानात’ १ कोटी रुपयांचे बक्षीस मिळवले आहे. स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या स्वच्छता, शिस्त आणि टापटीपपणाच्या संकल्पनांना साकार करणाऱ्या या कामगिरीमुळे बारामतीचा राज्यभर गौरव झाला आहे. या यशानंतर सोशल मीडियावर अनेकांकडून या कामगिरीचे श्रेय स्व. माजी उपमुख्यमंत्री Ajit Pawar यांना दिले […]
प्रेमात धोका ते IAS पर्यंतचा प्रवास: आदित्य पांडे यांची प्रेरणादायी कहाणी
बिहारच्या आदित्य पांडे यांची कहाणी अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. लहानपणापासून अभ्यासात हुशार असलेले आदित्य दहावीत असताना प्रेमात पडले आणि त्याचा परिणाम त्यांच्या शिक्षणावर झाला. अभ्यासाकडे दुर्लक्ष झाल्यामुळे त्यांच्या गुणांमध्ये मोठी घसरण झाली. पुढे त्यांनी वडिलांच्या इच्छेखातर इंजिनिअरिंग पूर्ण केले, पण त्यांचे मन त्या क्षेत्रात रमत नव्हते. ज्या मुलीसाठी त्यांनी सर्वस्व दिलं, तिच्याचकडून त्यांना धोका […]
रुग्णालयाचा हलगर्जीपणा, डोळ्याची शस्त्रक्रिया करताना ६ वर्षीय मुलीचा मृत्यू
पुणे : दीनानाथ मंगेशकर रुग्णालय येथे सहा वर्षीय प्रियदर्शनी बागडे हिचा शस्त्रक्रियेदरम्यान मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. डोळ्यात तिरळेपणाची समस्या असल्याने तिला शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सर्व वैद्यकीय अहवाल सामान्य असल्याचे रुग्णालयाकडून सांगण्यात आले होते. मात्र ऑपरेशन थिएटरमध्ये नेल्यानंतर डोळ्यांत ड्रॉप टाकताच मुलीला अचानक रक्ताची उलटी सुरू झाली. त्यानंतर तिला तातडीने […]
अवघ्या 35 टक्क्यांनीही जिंकली लाखोंची मनं; सचिन रूपनवरचा संघर्षमय प्रवास
फोंडशिरस (ता. माळशिरस, जि. सोलापूर) येथील सचिन रूपनवर या विद्यार्थ्याने प्रतिकूल परिस्थितीवर मात करत दहावीच्या परीक्षेत यश मिळलं आहे. यामुळे सचिनने फोंडशिरस परिसरात प्रेरणादायी उदाहरण निर्माण केले आहे. अवघी सव्वातीन फूट उंची असलेल्या सचिनने सर्व विषयांत ३५ गुण मिळवत दहावी उत्तीर्ण होत गावासह तालुक्यात चर्चेचा विषय ठरला आहे. सचिन लहान असतानाच वडिलांचे छत्र हरपले. त्यानंतर […]
रिव्हॉल्व्हरच्या धाकावर दरोडा; चार आरोपी जेरबंद
बारामती । फेसबुकवर स्वस्त गहू देण्याचे आमिष दाखवून धाक दाखवत एकाची लुट करण्यात आली आहे. या प्रकरणी तासगाव येथील व्यापाऱ्याला बारामतीत बोलावून रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवत लुटणाऱ्या चौघांना बारामती तालुका पोलिसांनी अवघ्या काही तासांत अटक केली. 2 पिस्तुसांसह आरोपींकडून 8 लाख 15 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सूरज गावडे (रा. तासगाव) यांना फेसबुक मार्केटप्लेसवरील जाहिरातीद्वारे […]










