Home क्राइम

नसरापूरातील चिमुकलीवरील अत्याचार आणि हत्येप्रकरणी आरोपी भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी

नसरापूर येथील तीन वर्षीय चिमुरडीवरील बलात्कार आणि हत्येप्रकरणी आरोपी भीमराव कांबळे याला न्यायालयाने मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली. हा गुन्हा अत्यंत क्रूर, अमानुष आणि समाजाच्या सामूहिक विवेकाला हादरवणारा असल्याचे न्यायालयाने नमूद केले.

निर्णयात आरोपीचा गुन्हेगारी इतिहास, पीडितेवरील अमानुष अत्याचार, निर्घृण हत्या आणि पश्चात्तापाचा अभाव यांचा उल्लेख करण्यात आला. आरोपीच्या बाजूने शिक्षा कमी करण्यासारखी कोणतीही परिस्थिती नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.

निर्भया प्रकरणानंतरही अशा घटना घडत असल्याबद्दल न्यायालयाने चिंता व्यक्त करत, या निर्णयातून बालकांवरील लैंगिक अत्याचार आणि हत्येसारख्या गुन्ह्यांविरोधात कठोर संदेश दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *