Home आंतरराष्ट्रीय आरोग्य क्राइम क्रीडा मनोरंजन राजकीय शेती संपादकीय सामाजिक

बारामती निवडणुकीत शरद पवारांचा उमेदवार देणार का? शशिकांत शिंदेंनी मांडलं थेट गणितच, पवारांसोबत बैठकीनंतर काय निर्णय?

बारामती विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. उद्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. तर काँग्रेसने उमेदवार उभा करण्याचे जाहीर केले आहे. त्याचवेळी जर शरद पवारांची राष्ट्रवादी उमेदवार उभा करणार असेल तर पाठिंबा देण्याची तयारी दर्शवली आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी अपेक्षा सुनेत्रा पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अनेक नेत्यांनी व्यक्त केली आहे. त्यातच आज शरद पवार आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्यात बैठक झाली. त्यांनी या बैठकीनंतर राष्ट्रवादीची भूमिका जाहीर केली.

अजितदादा पवार यांना श्रद्धांजली म्हणून आम्ही बारामती पोटनिवडणूक लढवणाीर नसल्याचे शरद पवार राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी जाहीर केले. शरद पवार यांच्याशी बैठक झाल्यानंतर त्यांनी ही भूमिका प्रसार माध्यमांसमोर मांडली. तर राहुरी पोट निवडणुकीसंदर्भात आज बैठक झाली. चर्चा करुन त्याविषयीचा निर्णय घेतला जाईल असे शिंदे म्हणाले. राहुरी लढवण्यासासंदर्भात मविआ सोबत चर्चा सुरू असल्याचे ते म्हणाले.

पोटनिवडणुकीत उमेदवार देण्याचा काँग्रेसची भूमिका हा त्यांचा अधिकार आहे. आमची त्यांच्याशी चर्चा सुरू आहे. शरद पवार यांच्याशी बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या बाबतीत चर्चा केली आहे. अजित दादा यांचं निधन झालं तेव्हाच आम्ही ठरवलं की लढवणार नाही. प्राजक्त तनपुरे यांच्याशी चर्चा झाली ते आज शरद पवार आणि जयंत पाटील यांच्याशी आज बोलणं होईल असे ते म्हणाले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *