Home शेती

मोठी बातमी | शेतकरी कर्जमाफी लांबणीवर; 5 जुलैची डेडलाइन चुकण्याची शक्यता

राज्य सरकारच्या शेतकरी कर्जमाफीच्या निर्णयाला आणखी विलंब होण्याची शक्यता आहे. कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी बारामतीतील एका कार्यक्रमादरम्यान ही माहिती दिली आहे. सरकारने कर्जमाफीसाठी पात्र शेतकऱ्यांची माहिती आयकर (इन्कम टॅक्स) विभागाकडून मागवली असून, ही माहिती प्राप्त झाल्यानंतरच कर्जमाफीची अंतिम प्रक्रिया राबवली जाईल.

सरकारच्या निकषानुसार, जे शेतकरी आयकर भरतात त्यांना कर्जमाफीचा लाभ दिला जाईल की नाही यावर अधिकारी चर्चा करतील. त्यामुळे पात्र लाभार्थ्यांची पडताळणी पूर्ण झाल्यावर कर्जमाफी होण्याची शक्यता आहे.

या प्रक्रियेमुळे सरकारने निश्चित केलेली 5 जुलैची डेडलाइन चुकण्याची शक्यता असल्याचे मंत्री दत्तात्रेय भरणे यांनी बोलून दाखवलं. त्यामुळे कर्जमाफीची वाट पाहणाऱ्या लाखो शेतकऱ्यांना आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागू शकते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *