Home शेती

मोठी बातमी | शेतकरी कर्जमाफी लांबणीवर; 5 जुलैची डेडलाइन चुकण्याची शक्यता

राज्य सरकारच्या शेतकरी कर्जमाफीच्या निर्णयाला आणखी विलंब होण्याची शक्यता आहे. कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी बारामतीतील एका कार्यक्रमादरम्यान ही माहिती दिली आहे. सरकारने कर्जमाफीसाठी पात्र शेतकऱ्यांची माहिती आयकर (इन्कम टॅक्स) विभागाकडून मागवली असून, ही माहिती प्राप्त झाल्यानंतरच कर्जमाफीची अंतिम प्रक्रिया राबवली जाईल. सरकारच्या निकषानुसार, जे शेतकरी आयकर भरतात त्यांना कर्जमाफीचा लाभ दिला जाईल की नाही यावर […]

Home आरोग्य सामाजिक

बारामतीत दोन दिवसाआड पाणीपुरवठा; नगरपालिकेचा मोठा निर्णय

बारामती : एल निनोच्या प्रभावामुळे कमी झालेला पाऊस, घटलेले जलसाठे आणि नीरा डावा कालव्याचे आवर्तन बंद असल्याने बारामती शहरात पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे बारामती नगरपरिषदेकडून शहरात दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नगरपरिषदेने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, शहरातील विविध भागांना ठराविक दिवशी पाणीपुरवठा केला जाणार असून पुढील आदेशापर्यंत हे नियोजन लागू राहणार […]

Home

स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियानात बारामती बसस्थानकाची बाजी…

बारामती बसस्थानकाने राज्यातील ‘अ’ वर्ग बसस्थानकांमध्ये प्रथम क्रमांक पटकावत ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियानात’ १ कोटी रुपयांचे बक्षीस मिळवले आहे. स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या स्वच्छता, शिस्त आणि टापटीपपणाच्या संकल्पनांना साकार करणाऱ्या या कामगिरीमुळे बारामतीचा राज्यभर गौरव झाला आहे. या यशानंतर सोशल मीडियावर अनेकांकडून या कामगिरीचे श्रेय स्व. माजी उपमुख्यमंत्री Ajit Pawar यांना दिले […]

Home

जय पवार विधानपरिषदेवर आमदार होणार? मिटकरींची नेमकी मागणी काय?

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधानपरिषदेतील रिक्त जागेसाठी अमोल मिटकरी यांनी जय पवार यांना उमेदवारी देण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात त्यांनी सुनेत्रा पवार यांना अधिकृत पत्र पाठवले आहे. या पत्रात मिटकरी यांनी नमूद केले आहे की, विधानपरिषदेतील रिक्त जागेसाठी सध्या विविध स्तरावर चर्चा सुरू असून संपूर्ण राज्याचे लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे. अशा परिस्थितीत पक्षाचे भविष्यातील बळकटीकरण […]