Home

जय पवार विधानपरिषदेवर आमदार होणार? मिटकरींची नेमकी मागणी काय?

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधानपरिषदेतील रिक्त जागेसाठी अमोल मिटकरी यांनी जय पवार यांना उमेदवारी देण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात त्यांनी सुनेत्रा पवार यांना अधिकृत पत्र पाठवले आहे.

या पत्रात मिटकरी यांनी नमूद केले आहे की, विधानपरिषदेतील रिक्त जागेसाठी सध्या विविध स्तरावर चर्चा सुरू असून संपूर्ण राज्याचे लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे. अशा परिस्थितीत पक्षाचे भविष्यातील बळकटीकरण आणि विस्तार लक्षात घेऊन निर्णय घेणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

मिटकरी यांनी आपल्या पत्रात जय पवार यांच्या कार्यक्षमतेचा आणि संघटनात्मक अनुभवाचा विशेष उल्लेख केला आहे. पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी सक्षम, अभ्यासू आणि कार्यकर्त्यांशी सातत्याने संपर्क ठेवणारे नेतृत्व पुढे आणण्याची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

तसेच, युवकांना प्रेरित करण्याची क्षमता आणि पक्षाच्या धोरणांना प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचवण्याची ताकद जय पवार यांच्यात आहे. त्यांच्या निवडीमुळे पक्षाला नवी ऊर्जा मिळेल आणि संघटना अधिक गतिमान होईल, असा विश्वास मिटकरी यांनी व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *