बारामती: शहरात दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी 52 वर्षीय आरोपी हसन झारी याला पोस्को गुन्ह्याअंतर्गत अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने सात आणि तेरा वर्षांच्या दोन मुलींशी चॉकलेट देऊन ओळख वाढवली आणि त्यानंतर त्यांच्यावर अत्याचार केला आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
महत्वाची बाब म्हणजे, आरोपी हसन झारी याने यापूर्वी 2009 साली देखील 13 वर्षीय मुलीवर अत्याचार केला होता. त्या प्रकरणात त्याला 10 वर्षांची शिक्षा झाली होती. शिक्षा भोगून बाहेर आल्यानंतर पुन्हा त्याने असेच कृत्य केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी 4 एप्रिल रोजी बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली आहे. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास बारामती शहर पोलीस करत आहेत.




