राजकीय

गोकुळ गितेंचा शिवसेना प्रवेश ‘वेटिंग’वर? ऐनवेळी कार्यक्रम स्थगित

नाशिकचे नेते गोकुळ गिते यांच्या शिवसेना (शिंदे गट) प्रवेशाबाबत ऐनवेळी मोठा ट्विस्ट आला आहे. विशेष विमानाने मुंबईत दाखल झालेल्या गिते यांचा पक्षप्रवेश सध्या ‘वेटिंग’वर ठेवण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

आज सायंकाळी 6.15 वाजता बाळासाहेब भवन येथे गिते यांचा पक्षप्रवेश होणार होता. त्यानंतर कार्यक्रमाची वेळ बदलून 7.15 वाजता नंदनवन येथे प्रवेश होणार असल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले. मात्र नंतर प्रवेश कार्यक्रम रद्द करण्यात आला.

“सध्या गोकुळ गितेंचा पक्षप्रवेश होणार नाही. त्याबद्दल चर्चा करून पुढील निर्णय घेतला जाईल,” अशी माहिती शिवसेना पक्षाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे गोकुळ गिते यांच्या शिवसेना प्रवेशाबाबत अनिश्चितता निर्माण झाली असून यामागील कारणांबाबत विविध तर्क-वितर्क लावले जात आहेत. आता पुढील चर्चेनंतरच प्रवेशाबाबत अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *