Home

रुग्णालयाचा हलगर्जीपणा, डोळ्याची शस्त्रक्रिया करताना ६ वर्षीय मुलीचा मृत्यू

पुणे : दीनानाथ मंगेशकर रुग्णालय येथे सहा वर्षीय प्रियदर्शनी बागडे हिचा शस्त्रक्रियेदरम्यान मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. डोळ्यात तिरळेपणाची समस्या असल्याने तिला शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सर्व वैद्यकीय अहवाल सामान्य असल्याचे रुग्णालयाकडून सांगण्यात आले होते.

मात्र ऑपरेशन थिएटरमध्ये नेल्यानंतर डोळ्यांत ड्रॉप टाकताच मुलीला अचानक रक्ताची उलटी सुरू झाली. त्यानंतर तिला तातडीने आयसीयूमध्ये हलवण्यात आले. पालकांना सुरुवातीला केवळ सीपीआर सुरू असल्याची माहिती देण्यात आली, मात्र काही वेळातच मुलीचा मृत्यू झाला.

या प्रकरणात रुग्णालय प्रशासनाने घटना दडपण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालय यांनी पोलिस तक्रार आवश्यक असल्याचे सांगितल्यानंतर प्रकरण पोलिसांकडे गेले. मात्र शवविच्छेदन अहवाल येईपर्यंत गुन्हा दाखल करता येणार नसल्याची भूमिका पोलिसांनी घेतली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *