Home

अवघ्या 35 टक्क्यांनीही जिंकली लाखोंची मनं; सचिन रूपनवरचा संघर्षमय प्रवास

फोंडशिरस (ता. माळशिरस, जि. सोलापूर) येथील सचिन रूपनवर या विद्यार्थ्याने प्रतिकूल परिस्थितीवर मात करत दहावीच्या परीक्षेत यश मिळलं आहे. यामुळे सचिनने फोंडशिरस परिसरात प्रेरणादायी उदाहरण निर्माण केले आहे. अवघी सव्वातीन फूट उंची असलेल्या सचिनने सर्व विषयांत ३५ गुण मिळवत दहावी उत्तीर्ण होत गावासह तालुक्यात चर्चेचा विषय ठरला आहे.

सचिन लहान असतानाच वडिलांचे छत्र हरपले. त्यानंतर आईने अत्यंत खडतर परिस्थितीत सचिन व त्याच्या बहिणीचा सांभाळ करत त्यांना शिक्षण दिले. आर्थिक अडचणी, कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि शारीरिक अडचणी अशा अनेक संकटांचा सामना करत सचिनने शिक्षणाची जिद्द मात्र सोडली नाही.

उंचीचा विकास कमी प्रमाणात झाला असला तरी आत्मविश्वास आणि मेहनतीच्या जोरावर सचिनने दहावीची परीक्षा उत्तीर्ण केली. विशेष म्हणजे सर्व विषयांत ३५ गुण मिळवत त्याने यश संपादन केले. त्याच्या या यशामुळे फोंडशिरस गावात तसेच माळशिरस तालुक्यात त्याचे कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *