मध्य प्रदेश राज्यातील नर्मदा नदी परिसरात घडलेल्या भीषण दुर्घटनेने संपूर्ण देश हादरला आहे. बर्गी धरण क्षेत्रात झालेल्या बोट दुर्घटनेत 9 जणांना जीव गमवावा लागला तर एकूण 22 जणांचा जीव वाचविण्यात प्रशासनाला यश आलं आहे.
या घटनास्थळी सुरू असलेल्या बचावकार्या दरम्यान एक हृदयस्पर्शी प्रसंग समोर आला. बचाव पथकाने जेव्हा एका आई आणि तिच्या लहान बाळाचा मृतदेह बाहेर काढला, तेव्हा त्या आईने आपल्या बाळाला घट्ट मिठीत धरून ठेवले होते. मृत्यूच्या दारातही तिने आपल्या लेकराला सोडले नाही. तिच्या त्या घट्ट मिठीतून आईच्या निस्वार्थ आणि अथांग प्रेमाची प्रचिती सर्वांना आली.
प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, त्या आईने शेवटच्या क्षणापर्यंत आपल्या बाळाचे संरक्षण करण्याचा प्रयत्न केला. तिची ही माया पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले.
या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांना प्रशासन आणि स्थानिकांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. प्रशासनाकडून योग्य ती मदत करून घटनेच्या चौकशीचे आदेश दिले गेलेत.




