पुणे : अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर VSR कंपनीबाबत पार्थ पवार यांनी थेट आक्रमक भूमिका न घेता सावध आणि मोजकी भूमिका घेतली होती. उपलब्ध अहवालांनुसार, त्यांनी या प्रकरणात भावनिक प्रतिक्रिया न देता तपास यंत्रणांवर विश्वास ठेवावा, सत्य बाहेर येऊ द्यावे असा सूर ठेवला होता.
पार्थ पवार यांनी म्हटले की, ‘मोती बाग येथे शरद पवार यांना भेटण्यासाठी तातडीने पोहोचणे आवश्यक होते. त्यामुळे त्यांनी आपल्या कार्यालयाला विमानाची व्यवस्था करण्याचे निर्देश दिले होते. यादरम्यान “प्रशासकीय पातळीवरील चुकीमुळे VSR चे बुकिंग झाले” असे सांगितले आणि संबंधित एजंटशी करार रद्द केल्याचे स्पष्ट केले. तसेच VSR बाबत आपला विरोध कायम असल्याचेही म्हटले.
‘’VSR Aviation संदर्भात आपली पूर्वीची भूमिका कायम असल्याचेही त्यांनी याच पोस्टमध्ये म्हटले आहे. आमचा या कंपनीला स्पष्ट विरोध होता आणि पुढेही तसाच राहील,” असे त्यांनी नमूद केले. त्यांनी ‘X’ द्वारे आपले स्पष्टीकरण दिले आहे.




