मुंबई : आगामी महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने आपल्या सहा उमेदवारांची अधिकृत घोषणा केली आहे. पक्षाकडून सुनील विनायक कर्जतकर, माधवी नाईक, संजय नत्थूजी भेंडे, विवेक बिपिनदादा कोल्हे, प्रमोद शांताराम जठार आणि प्रज्ञा राजीव सातव यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
भाजपच्या या घोषणेमुळे राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला असून विधान परिषद निवडणुकीत पक्षाने जोरदार तयारी सुरू केल्याचे दिसून येत आहे. विविध भागांतील सामाजिक आणि राजकीय समतोल साधण्याचा प्रयत्न उमेदवार निवडीत करण्यात आल्याची चर्चा आहे.
दरम्यान, आता महाविकास आघाडी आणि इतर पक्षांकडून कोणती नावे जाहीर होणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. येत्या काही दिवसांत प्रचाराला वेग येण्याची शक्यता असून राज्यातील राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे दिसत आहेत.




