अजित दादांच्या अपघाताचे फुटेज देण्यास नकार, का?
राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातप्रकरणी नव्या घडामोडी समोर आल्या आहेत. २८ जानेवारी २०२६ रोजी मुंबई विमानतळावरील पहाटे ६ ते सकाळी ९ या वेळेतील सीसीटीव्ही फुटेज मागवण्यात आले होते. मात्र केंद्रीय नागरी विमान वाहतूक विभागाने ही माहिती देण्यास नकार दिल्याने प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
माहिती अधिकारांतर्गत केलेल्या मागणीवर नकार मिळाल्यानंतर संबंधितांनी सर्वोच्च न्यायालय व केंद्रीय माहिती आयोगाच्या निर्णयांचा दाखला देत पुन्हा अपील केले आहे. तसेच मुंबईतील देवगिरी शासकीय निवासस्थान ते मंत्रालय दरम्यानचे वाहतूक पोलीस विभागाकडील सीसीटीव्ही फुटेजही मागवण्यात आले आहे.

फुटेज नाकारण्याचा निर्णय धक्कादायक असल्याचे सांगत संबंधितांनी ते तात्काळ उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी केली आहे.
