सहयोग सोसायटीबाहेर अघोरी विद्या? अपघातस्थळी ४ नारळ? अजित पवारांचा घात, अपघात? की आणखी काय?
- बारामती : अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर बारामतीत पुन्हा एकदा वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. अपघातस्थळी चार नारळ आढळून आल्याने सोशल मीडियावर विविध तर्कवितर्कांना सुरुवात झाली आहे. यापूर्वी सहयोग सोसायटी परिसरात आढळलेल्या संशयास्पद पूजेच्या साहित्याच्या घटनेनंतर आता या नव्या प्रकारामुळे चर्चेल उधाण आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 17-18 नोव्हेंबरला सहयोग सोसायटीजवळ साफसफाई कर्मचाऱ्यांना काही पूजासाहित्य आढळले होते. ते अघोरी विद्येचे असल्याचे म्हटले जात आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. काही नेटकऱ्यांनी या प्रकाराचा संबंध विमान अपघाताशी जोडण्याचा प्रयत्न केला होता. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नव्हती.
दरम्यान, अपघातस्थळी तब्बल 18 दिवसांनंतर 4 नारळ आढळल्याची माहिती समोर आली आहे. हे नारळ नेमके कोणी आणि कोणत्या उद्देशाने ठेवले, याबाबत अद्याप माहिती नाही. तज्ज्ञांच्या मते, अशा घटनांबाबत ठोस पुरावे समोर येईपर्यंत अफवांवर विश्वास ठेवू नये.
