पुण्यात विविध पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश
पुण्यात विविध पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश
पुणे : पुण्यातील विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी सर्व नव्या सहकाऱ्यांचे मनापासून स्वागत करण्यात आले असून, त्यांच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा अजित पवारांकडून देण्यात आल्या.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी, विकासासाठी आणि प्रगतीसाठी सातत्याने काम करणारा पक्ष आहे. पक्षाच्या विचारधारेवर विश्वास ठेवून लोकहितासाठी एकत्र येण्याचा निर्णय घेतलेल्या नव्या सहकाऱ्यांमुळे पक्ष अधिक मजबूत होईल, असा विश्वास यावेळी अजित पवारांनी व्यक्त केला
नवीन प्रवेश केलेल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा अनुभव, कष्ट आणि कार्यशैलीचा उपयोग पुणे शहरासह महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी निश्चितच होईल, असा विश्वासही यावेळी व्यक्त अजित पवारांनी बोलून दाखवला.
