नेपाळमधील आंतरराष्ट्रीय स्पर्धेत यश; बारामतीच्या पूर्वा पाटीलचे अजित पवारांकडून कौतुक
नेपाळमधील आंतरराष्ट्रीय स्पर्धेत यश; बारामतीच्या पूर्वा पाटीलचे अजित पवारांकडून कौतुक
नेपाळ येथे पार पडलेल्या साउथ एशियन गोल शॉट बॉल आंतरराष्ट्रीय स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावत राज्यासह देशाचे नाव उज्ज्वल करणारी बारामतीची सुपुत्री कु. पूर्वा तानाजी पाटील हिने आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सदिच्छा भेट घेतली.
या भेटीदरम्यान अजित पवार यांनी पूर्वाच्या उल्लेखनीय कामगिरीचे मनापासून कौतुक करत तिचे अभिनंदन केले. मेहनत, जिद्द आणि सातत्याच्या जोरावर पूर्वाने आंतरराष्ट्रीय स्तरावर हे यश मिळवले असून तिची कामगिरी ही इतर युवा खेळाडूंना प्रेरणा देणारी असल्याचे त्यांनी सांगितले.
अजित पवार यांनी पूर्वाच्या पुढील क्रीडा वाटचालीसाठी शुभेच्छा देत, भविष्यातही ती अशीच यशस्वी कामगिरी करत देशाचे नाव उंचावेल, असा विश्वास व्यक्त केला.
