वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात ड्रोन (रिमोट) पायलट प्रशिक्षण
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात ड्रोन (रिमोट) पायलट प्रशिक्षण
पुणे दि. 22 (जिमाका वृत्त सेवा) : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथील रिमोट पायलट प्रशिक्षण संस्था ही भारतीय नागरी विमान वाहतूक महासंचालनालय मान्यताप्राप्त संस्था असून, कुशल ड्रोन पायलट घडविण्यासाठी प्रमाणित प्रशिक्षण देण्यात येते. या प्रशिक्षणामध्ये वर्ग प्रशिक्षण, सिम्युलेटर आधारित प्रशिक्षण तसेच प्रत्यक्ष फ्लायिंग सत्रांचा समावेश आहे. संस्थेमार्फत लघु श्रेणी रिमोट पायलट प्रमाणपत्र कोर्स (7 दिवस), मध्यम श्रेणी रिमोट पायलट प्रमाणपत्र कोर्स (7 दिवस) तसेच लघु व मध्यम श्रेणी संयुक्त रिमोट पायलट प्रमाणपत्र कोर्स (10 दिवस) उपलब्ध आहेत.
या कोर्ससाठी किमान शैक्षणिक पात्रता दहावी उत्तीर्ण असून वयोमर्यादा 18 ते 65 वर्षे आहे. उमेदवारांकडे वैध वैद्यकीय प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. प्रवेशासाठी चार पासपोर्ट आकाराचे फोटो (पांढऱ्या पार्श्वभूमीसह), दहावीची मूळ गुणपत्रिका, प्रमाणपत्र, आधार कार्ड, एक अतिरिक्त ओळखपत्र (पासपोर्ट, मतदान कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, रेशन कार्ड), वरील सर्व कागदपत्रांच्या स्वयंघोषित प्रती तसेच वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
